HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी कधीही विसर्जित होईल, दिलीप वळसे पाटील सावध राहा गोपीचंद पडळकर!

पुणे। आम्ही लोकशाही पद्धतीने चालणारे आहोत असे राष्ट्रवादी पक्ष वारवांर सांगत असतो. मात्र पक्षात खरंच लोकशाही आहे का ? हाच प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कधीच बदलत नाही. राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही, हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, असा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. ते जुन्नरमधील बेल्हे इथल्या भाजपाच्या मेळाव्यास संबोधन करत होते. राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली अन्यथा मोडून खाल्ली अशी दयनीय अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. राष्ट्रवादीची व्याख्या आता वेगळीच आहे. हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, असा घणाघातही गोपीचंद पडळकर यांनी केला.

शरद पवारांना असा गृहमंत्री पाहिजे की जो पैसे गोळा करेल आणी पोटात राहील

महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार स्थापन झालं आणि शरद पवारांनी पुतण्याला उपमुख्यमंत्री केलं. राष्ट्रवादीला नेहमी सत्तेत गृहमंत्रालय पाहिजे असतं. मग पवारांनी अनिल देशमुखांना शोधलं, त्यांचं कधी नाव ऐकलं होतं का? असा खोचक सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला होता. शरद पवारांना असा गृहमंत्री पाहिजे की जो पैसे गोळा करेल आणी पोटात राहील, रोज नोटा बारामतीला पोहोच करेल असा गृहमंत्री ते शोधतात. म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपण सावधान राहा, असा सल्लाही गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना दिला.

काय म्हणाले सचिन खरात?

“गोपीचंद पडळकरजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करण्यापेक्षा भाजप आणि धनगर आरक्षणाची काळजी करा. कोलांट्या उड्या मारून तुम्ही ज्या पक्षात आज आला आहात, त्यांचा मूळ पक्ष स्वार्थासाठी जनता पार्टीत विसर्जित झाला होता. पुढे दुहेरी सदस्यत्वावरुन तुमच्या पक्षाच्या लोकांना वाळीत टाकलं होतं. आता पुढे याची काळजी करा, की तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला कधी वाळीत टाकतील, याचा विचार करा, त्यामुळे ध्यानात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणीही वाळीत टाकणार नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले, शाहू, आंबेडकर विचाराचा आहे” असं सचिन खरात म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी ! पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी दिला मुख्यमंत्र्यांकडे अखेर राजीनामा

News Desk

“भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही” -नवाब मलिक

News Desk

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण

News Desk