HW News Marathi
महाराष्ट्र

17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेलमध्ये जाणार; सेना नेत्याचं मोठं वक्तव्य

बीड | बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही ‘शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका आघाडीचा धर्म पाळा. टक्केवारी घेणं आणि 17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेल मध्ये जाणार आहे’ असा इशाराच त्यांनी दिला आहे.

बीडमध्ये आयोजित शिवसेना प्रवेशाच्या जाहीर सभेत चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रवादीवरच जोरदार हल्लाबोल केला. महाआघाडीच्या इतर नेत्यांना इशारा देत आपण आघाडीमध्ये आहोत आपापसात मतभेद करायचे नाहीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही. महाविकास आघाडीत आम्ही देखील आहोत, त्यामुळे कुठलाही शिवसैनिकावरील अन्याय सहन केला जाणार नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी बजावून सांगितलं.

‘मी आघाडीच्या नेत्यांना ही सांगू इच्छितो आपण आघाडीमध्ये आहोत, आपलामध्ये मतभेद करायचे नाहीत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही आपण सगळे एक आहोत आपण एका कुटुंबातील आहोत उद्धवजी आपले प्रमुख आहेत अजितदादा प्रमुख आहेत. नेहमी गुंगीत असणारे त्यांनी समजुन घ्यावं’ असं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वरती विकास तर सोडले कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत लक्षवेधी मांडणारे स्वतः कायदा किती पाळतात, ते आम्हाला माहीत आहेत’ अशी टीकाही खैरेंनी केली.

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे अधिकाऱ्यांना शिव्या देत आहेत. एकही अधिकारी यापुढे आमदाराचे काम ऐकणार नाही. लिहून घ्या, मी विभागीय आयुक्तांना सांगणार आहे. दिवसभर गुंगीत असणारा माणूस लोकांना शिव्या देतो त्या माणसाला जागा दाखवा, असंही खैरे म्हटलं.”

“जे स्वतःच्या बापाला नीट बोलत नाहीत, सहकाऱ्यांवर ब्लॅकमेलिंगचे आरोप करतात,जुन्या कामाचे स्वतः श्रेय घेतात ते डाकू आहेत अस म्हणत संदिप क्षीरसागर यांच्यावर टीका करत लगीन लोकांचं अन नाचतंय…….! अस म्हणत क्षीरसागर यांचे जुने सहकारी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केला. पाच टक्क्यासाठी झुकेगा अन दहा टक्यासाठी लोटांगण घालेगा”, अशी टीका केली. तसंच आमच्या नादाला लागू नका नाहीतर तुमची अंडी पिल्ले आम्ही बाहेर काढू असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींचे संबंध काय?, किरीट सोमय्यांचा सवाल

Aprna

विरोधक कुठे आहेत?विरोधक तर बिहार मध्ये आहेत! महाराष्ट्राच्या संकटाच्या काळात शरद पवार धावून येतात–धनंजय मुंडे

News Desk

फडणवीस म्हणतात, शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे !

News Desk