HW News Marathi
Covid-19

“कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला भाजप कारणीभूत ठरणार”- नवाब मलिक

जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप गर्दी जमवत आहे

जनाशीर्वाद यात्रेवरून विरोधक आधीपासूनच टीका करत आहेत. जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप गर्दी जमवत आहे. राज्यातही राजकीय कार्यक्रम होत आहेत. या राजकीय कार्यक्रमामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. राज्यसरकारने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर निश्चितरुपाने गुन्हा दाखल करुन कारवाई होणार आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. निवडणूका येत – जात राहतील परंतु लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यात्रेतून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडताना दिसत आहे

भाजपच्या चारही केंद्रीय मंत्र्यांनी राज्यभरात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रांना प्रचंड गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी लोक मास्क शिवाय यात्रेत सहभागी होत आहेत. या यात्रेतून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा स्फोट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही रॅली काढून गर्दी जमवण्यास सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्र्यांची जनयात्रा सुरु असल्याने त्यावर आता विरोधी पक्षाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात… ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनचा निर्णय येत्या ८ दिवसांत होणार ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना काय इशारा दिला ?

News Desk

देशात मृतांचा आकडा घटला, कोरोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा जास्तच!

News Desk

राज्याचा एकूण रुग्णांचा आकडा ४,४१,२२८ वर पोहोचला

News Desk