HW News Marathi
देश / विदेश

“भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे!”

मुंबई | भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सक्षम तयारी करण्याचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले. शरद पवार यांनी पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांच्याशी आज (१ डिसेंबर) भेट झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. हे नाते सक्षम करण्यासाठी बॅनर्जी या मुंबईत आल्या असल्याचे पवारांनी सांगितले. भाजपविरोधातील नव्या आघाडीची तयारी सुरू असताना काँग्रेसला बाजुला केले जात असलेल्या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, “जे भाजपविरोधात आहेत, त्या सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे पवारांनी म्हटले आहे. तसेच मोदीविरोधात सर्वजण एकत्र येणार असेल तर त्यांचे कोण नेतृत्त्व करणार यावर प्रश्नावर पवार म्हणाले, “भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून नेतृत्त्व कोण करणार हा दुसरा मुद्दा आहे.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती लवकरच बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली असून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आल्याचे बॅनर्जींनी सांगितले. कट्टरता वाद विरोधात सक्षण पर्याय द्याला हवा. देशातील कट्टरता वाद विरोधात सक्षण पर्याय द्याला हवा, असे देखील बॅनर्जी म्हणाले. या बैठकीत राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर आदी नेते देखील उपस्थित होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नववारी साडी नेसून पार केली 42 किलोमीटरची स्पर्धा

News Desk

अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाने केली रद्द!

News Desk

“नितीश कुमार त्यांच्या सोबत झालेला घात पचवतील?” रोहित पवारांचा सवाल  

News Desk