HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांच्या हत्येचा कट, पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गोपनीय तातडीची तक्रार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया यांनी आज (८ फेब्रुवारी) तक्रार पुण्यात दाखल केली आहे. ही तक्रार खाबिया हे पुण्यातील शिवाजी नगर भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, पुणे सायबर पोलीस विभागाने त्यांच्या तक्रारीची नोंद करुन घेतली आहे.

काही वेबपोर्टलवरुन शरद पवार यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषणांचे व्हिडीओ टाकले जात आहेत. त्याखाली शरद पवार यांच्याविरोधात टोकाच्या कमेंट केल्या जात आहेत. या कमेंटवरुन शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप लक्ष्मीकांत खांबिया यांनी केला आहे.

पत्रकार भाऊ तोरसेकर आणि घनश्याम पाटील यांनी युट्युब चॅनेलवर कमेंट करणाऱ्यांविरोधात लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियात सातत्यानेच शरद पवार यांच्यावर जोरदार टीका होत असते. यात चिथावणीखोर भाषाही वापरली जाते. याची दखल घेऊन तातडीने अशा कमेंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लक्ष्मीकांत खांबिया यांनी केली आहे.

 

Related posts

आजपासून सोलापुरात संचारबंदी, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

News Desk

यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर

News Desk

#CoronaVirus : कॉर्पोरेट कंपन्यांशी सकारात्मक चर्चा, राज्यात शटडाऊनची गरज, आरोग्यमंत्री

अपर्णा गोतपागर