HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबै बँकेवर प्रवीण दरेकरांचं वर्चस्व संपुष्ठात; राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष

मुंबई | मुंबै बँकेवरील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व संपुष्ठात आले आहे. आणि आता मुंबै बँक अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांना विजय मिळाला आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती झाली आहे. यात सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळवून विजय, भाजपचे प्रसाद लाड यांना ९ मते आणि उपाध्यक्ष पदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली आहेत. 

मुंबै बँकेत दरेकरांनी एकूण २१ जागांपैकी २१ जागांवर निर्विवाद विजय मिळाला होता. परंतु सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र ठरवल्यानंतर दरेकरांना मोठा धक्का बसला होता. यामुळे दरेकरांची मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदापासून दूर रहावे लागेल.  बँकेच्या निवडणुकीपूर्वी आज (१३ जानेवारी) सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली. 

मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले असून त्यांना कामाचा अनुभव देखील आहे. तसेच मुंबईचे एक वर्षांचे अध्यक्ष पद हे एका वर्षानंतर शिवसेनेला देण्यात येणार आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता

News Desk

पेट्रोल-डिझेलनंतर आता एसटीची भाडेवाढ?

News Desk

कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अ‌ॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Aprna