HW News Marathi
महाराष्ट्र

तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी थेट रिक्षाच चालवून दाखवली

मुंबई | “महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झालं तेव्हा हे तीन चाकांचं सरकार असून ते कसं चालणार? अशी शंका विरोधकांनी उपस्थित केली होती. पण सरकारचा लोकांच्या हिताचा कारभार चांगला सुरुय, राहिला प्रश्न तीन चाकांच्या रिक्षाचा. तर ही रिक्षा चालवणंही सहजसोपं असून याचा अनुभव आज मी माझ्या मतदारसंघात घेतला”, असे म्हणत राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी आज (२० जून) विरोधकांना हा जोरदार टोला लगावला आहे. रोहित पवारांनी स्वतः याबाबतचे ट्विट केले आहे.

रोहित पवार यांनी आज कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे भेट दिली. यावेळी आमदार रोहित पवारांनी चक्क रिक्षा चालवली. यावेळी तिथे उपस्थित सर्वच जण रोहित पवारांकडे आवाक होऊन पाहत होते. टाकळीला भेट देऊन, नागरिकांशी भेटून-बोलून झाल्यानंतर तिथून निघताना रोहित पवारांनी रस्त्याच्या कडेला उभी रिक्षा पाहिली. रिक्षा कोणाची ? विचारात रिकाच्या मालकाशी बातचीत केली आणि चावी देता का विचारले. थोडे आश्चर्य वाटून त्या युवकाने चावी दिल्यानंतर रोहित पवारांनी थेट रिक्षा सुरु केली आणि ते चक्कर मारण्यासाठी निघाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आज १.३० वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून ‘या’ पाच जणांना मिळाली उमेदवारी

News Desk

अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करावे, होळकरांच्या वंशजांची मागणी

News Desk