HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अनेक लोकांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असल्याची चिन्हं दिसत आहेत. सातत्यानं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा पाहता यामुळं प्रशासनाची झोप उडाली आहे. सध्याच्या घडीला कोरोना संसर्गाची एकंदर परिस्थिती पाहता मुख्यमंत्री आणि इतर नेतेमंडळींच्या सातत्यानं होणाऱ्या बैठकांवरच अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्य म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, निर्णय आणि इतर महत्त्वाची पावलं उचलली जाणार का, याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच संपर्कात असणाऱ्या काही व्यक्तीचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामागोमाग मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोना झाल्याची बाब समोर आली. मुख्यमंत्र्यांच्या घरातच कोरोनानं शिरकाव केल्याचं वृत्त असतानाच आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजे अभिनेता आमिर खानलाही कोरोना झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच आमिर खानने एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. पाणी फाऊंडेशनच्या “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” पार पडला त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हजर होते. या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी आमिर कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता कोरोना काळात सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हा कोरोना अगदी जवळ पोहोचला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २८ जूनपासून सलून-पार्लर्स सुरु होणार, ‘हे’ नियम बंधनकारक

News Desk

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून पत्र लिहित सांत्वन

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३३ वरून थेट ३७ वर

News Desk