HW News Marathi
महाराष्ट्र

नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना दिले 4 महत्वाचे सल्ले!

मुंबई। साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा अखेर आज उपचारादम्यान मृत्यू झालाय. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. अशावेळी सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवदेन दिलं आहे. त्यात गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना 4 महत्वाचे सल्ले दिले आहेत.

परिस्थितीत बदल व्हावा आणि असे प्रकार घडू नयेत

महिलांवरील अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर निर्बंध कमी झाल्यावर सार्वजनिक ठिकाणी बलात्कार, अपहरण, सायबरक्राईम, यांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत बदल व्हावा आणि असे प्रकार घडू नयेत यासाठी गेल्या वर्षभराच्या कालावधीत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांचे सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन, महिला दक्षता समिती तसेच महिलांच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटना यांच्या अनेक बैठका घेतल्या. त्यांच्या अनुभवांच्या आधारे विधायक सुचना व निर्देशही दिले होते. यात रेल्वे पोलीस, राज्य पोलीस दल यांना CCTV संख्या वाढविणे, व ऑनलाईन देखरेख कार्यक्षम करून गुन्हे तिथल्या तिथे रोखणे, महिलांच्या तक्रारी लवकर समज़ुन माहिती होण्यास व्हाट्सअप ग्रुप करणे, तसेच सामाजिक संघटनांचा पोलीसांच्या तपासात, पिडीतांच्या समुपदेशनात सहभाग वाढविणे, या सूचनांचा समावेश होता.

1) मुंबईतील लोकल मधील महिलांना होणाऱ्या त्रास बाबत CCTV संख्या वाढविणे, गस्ती वाढविणे, वारंवार घटना घडणाऱ्या ठिकाणी लाईट लावणे, CCTV लावणे, टोल फ्री क्रमांकाचा प्रभावी वापर करणे. अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होणे करिता महिलांच्या सुरक्षितते बाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे ,सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे करीता आपण रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात. पुणे, ठाणे, सातारा येथील रेल्वेच्या हद्दीत झालेल्या विविध घटनां मुळे याची आवश्यकता जाणवते.

2) पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित केसेस तात्काळ निकाली काढण्यासाठी फिरती फास्टट्रॅक न्यायालये व फिरती न्यायालये कार्यान्वित करण्यात यावीत. पॅरोल वर सुटलेल्या पॉक्सोच्या गुन्हेगारांबाबत आढावा घेण्यात यावा. शक्ती कायदा पारित होईपर्यंत त्यामधील तरतुदी प्रमाणेच, सर्व पोलिस यंत्रणांनी, प्रचलित कायद्यानुसार तात्काळ अंमलबजावणी करावी असे निर्देश द्यावेत.

3) प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती स्थापन करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या सर्व पुनर्गठीत केल्या असून त्या महिलांना कामाचे स्वरूप,समितीचे अधिकार व कर्तव्ये समजावीत म्हणून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. याबाबत पोलीस प्रशासनास आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात.

4) पोस्कॉ अंतर्गत गुन्ह्यामध्ये शासनाने अत्याचार पीडित महिलेला तात्काळ मदत मिळावी म्हणून मनोधैर्य योजना सुरू केली. सदर योजनेत पीडित महिलेला किंवा बालकाला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळणेस भरपूर कालावधी लागतो. हा कालावधी कमी करणे आवश्यक असून हा कालावधी ७ दिवसांचा करणेबाबत संबंधित विधी व न्याय विभागाला आदेशीत करावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातूर ग्रामीण मतदारसंघ धीरज देशमुख यांच्यासाठी फिक्स केला, संभाजी निलंगेकरांचा खळबळजनक दावा

News Desk

शरद पवार, रोहित पवारांवरील टीका भोवली, भाजपचे प्रदीप गावडे सायबर पोलिसांच्या ताब्यात

News Desk

हॅलो! मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतोय ;सर्वसामान्य कार्यकर्त्याशी साधला फोनवरून संवाद…

News Desk