HW News Marathi
महाराष्ट्र

ना सिद्धू, ना जाखड, अंबिका सोनी यांचाही नकार… आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सुखजिंदर रंधावा!

चंदीगड। पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच काही सुटताना दिसत नाही. नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावे मागे पडल्यानंतर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीदासाठी नकार दिला आहे. त्यामुळे सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे याबाबत बैठक सुरू असून कोणत्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांच्याकडे हा प्रश्न गेला आहे. सोनिया गांधी आणि अंबिका सोनी यांची गेल्या पाऊण तासापासून मिटिंग सुरू असून अजूनही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, पंजाब काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव सोनिया गांधींकडे पाठवल्याचं सांगितलं जातं.

रंधावा कोण आहेत?

सुखजिंदर रंधावा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ते 62 वर्षाचे आहेत. पंजाबच्या डेरा बाबा नानक मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. राज्य सरकारमध्ये सध्या ते कॅबिनेत मंत्री आहेत. त्यांच्याकडे सहकार आणि तुरुंग प्रशासन ही खाती आहेत.याबाबत मीडियाने रंधावा यांना सवाल केला. तेव्हा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाचं मला माहीत नाही. मी पक्षातील कार्यकर्ता आहे. त्यामुळे काय घडत आहे हे मी सांगू शकत नाही, असं रंधावा म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचं सस्पेन्स वाढलं आहे.

म्हणूनच रंधावा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल

सूत्रांच्या मते रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. रंधावा हे ज्येष्ठ नेते आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच रंधावा यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. रंधावा यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच रंधावा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंध्रा प्रदेश सरकारने कुरुक्षेत्र महासभा उधळून लावले

News Desk

येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज

Gauri Tilekar

मलिक झाले बिनखात्याचे मंत्री; ‘या’ मंत्र्यांकडे सोपविली अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी

Aprna