HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक! परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

बीड | परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहीण -भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हत्याची ही घटना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) दुपारी उघडकीस आली आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी भेट दिली आहे. हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत सटवा ग्यानबा मुंडे रा. जिरवाडी (वय ६८) वर्ष यांचे शेत आहे. याच शेतात त्यांच्या बहीण शुभ्रा ग्यानबा मुंडे (वय ७०) त्यांच्याकडे राहत असत, या दोघा बहीण-भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आली.

जिरेवाडी ग्रामस्थ घटनास्थळी जमले असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी ही पोहोचले आहे परळी पासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथे सोमेश्वराचे मंदिर आहे या गावात गेल्या पंचवीस वर्षात सहसा अनुचित प्रकार घडत नाहीत. धार्मिक वारसा असलेल्या जिरेवाडी गावात गुरुवारी बहीण-भावांची हत्या झाल्याने जिरेवाडी गाव हादरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“त्या बार चालकांना अद्याप अटक का नाही?” काँग्रेसचे ईडीला ४ सवाल!

Gauri Tilekar

दिवसाढवळ्या भररस्त्यात खून झाल्याने बीड शहरात खळबळ

News Desk

गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?

News Desk