HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर

नवी मुंबई | नवी मुंबईत प्रस्तावित असलेल्या विमानतळाचे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण केले जाणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या संचालक मंडळाकडून हा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे.

मागील काही वर्षांपासून नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत. विमानतळाच्या जमीनीवरूनही बरेच वाद झाले आहेत. आता या विमानतळाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विमानतळ उभारणीस १ फेब्रुवारीला परवानगी दिली आहे. त्यानंतर काही दिवसांतच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यावर सिडकोकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोद्वारे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे नामकरण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मागवण्यात आला होता. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना याबाबत सुचना दिली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने ४ जानेवारीला सिडकोला याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.

राज्य शासनाच्या पत्रानंतर सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संचालक मंडळाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार हा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाकडे पाठवण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मंत्री गावितांनी निवडणूक आयोगापासून लपविली माहिती

News Desk

मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशाप्रकारची भाषा देवेंद्र फडणवीस हे कसे वापरू शकतात?-अनिल देशमुख

News Desk

हिंदुत्त्वावर शिंतोडे उडविणाऱ्या ‘त्या’ युवकावर कारवाई होत नाही, हा आश्चर्यजनक ! फडणवीस आक्रमक

News Desk