मुंबई | अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. ४ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात असतानाच्या वाझेंच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रातील रेतीबंदर खाडीत आढळून आला होता. त्यांच्या हत्येचा तपासही एनआयए करत असून, या प्रकरणी सचिन वाझे यांच्यासह आणखी काही जणांना अटक करण्यात आलेली आहे. ५ मार्चला मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे त्याअगोदर वाझेंच्या हालचालींचा शोध एनआयएकडून घेण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील सीसीटीव्हीत सचिन वाझे यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला आढळला होता. त्यांच्या पूर्वसंध्येला म्हणजे ४ मार्चला सायंकाळी ७ वाजता वाझे सीएसएमटीकडे जाताना दिसत आहेत. वाझे यांनी सीएसएमटीतून ठाण्याला जाणारी लोकल पकडली होती, असं तपासातून समोर आलं असून, एनआयएने वाझेंना सीन रिक्रिएट करण्यासाठी सीएसएमटीकडे आणलं होतं.
बनावट नावाने हॉटेलमध्ये मुक्कामसचिन वाझे यांच्यासाठी दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट नावाचा वापर करून एक रूम आरक्षित करण्यात आली होती, अशी माहिती तपासादरम्यान ‘एनआयए’ला मिळाली आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर ते खरं असल्याचं समोर आलं आहे. माहितीत तथ्य आढळले असून, सीसीटीव्ही चित्रणातून वाझे यांची या हॉटेलमध्ये ये-जा होती, असं स्पष्ट झालं. एका सीसीटीव्ही चित्रणात ‘एनआयए’ अधिकाऱ्यांना वाझेंसोबत एक महिलाही दिसून आली. सोमवारी जप्त करण्यात आलेली दुचाकीची याच महिलेच्या नावे नोंदणी होती, अशी माहिती आहे.
In CCTV footage (in pic), Sachin Waze was seen going to Chhatrapati Shivaji Maharaj Terminus at 7 pm on 4th March. He had taken a local train to Thane that day. He was brought to CSMT y'day for scene recreation
Body of Mansukh Hiren was found at Kalwa creek in Thane on 5th March pic.twitter.com/gnMfdaMLLQ
— ANI (@ANI) April 6, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.