नवी दिल्ली | राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान केंद्र सरकारने करोना साथीच्या दुसऱ्या लाटेवर मोठे विधान केले आहे. देश अजूनही करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. देशातील आरोग्य स्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या २४ तासांत देशात ४३,२६३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये ३२ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या आठवड्यात देशातील एकूण संक्रमित प्रकरणांपैकी ६८ टक्के रुग्ण केरळमध्येच आढळले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, प्रकरणांमध्ये घट होण्याचे प्रमाण ५० टक्के होते, जे या लाटेपेक्षा थोडे कमी आहे. आम्ही अजूनही करोना रुग्णसंख्येत वाढ पाहत आहोत, ही वाढ अद्याप संपलेली नाही. त्यांनी सांगितले की देशातील ३५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा साप्ताहिक संसर्ग दर अजूनही १० टक्क्यांहून अधिक आहे. देशात ३० जिल्हे अशे आहेत ज्यात साप्ताहिक संसर्गाचा दर ५ ते १० टक्के दरम्यान आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये ६१ टक्के केरळमध्ये आणि १३ टक्के महाराष्ट्रात आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये १० हजाराहून अधिक आणि ५० हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.
The pace of vaccination and coverage is rapidly increasing. The average per-day dose administered has increase from 20 lakhs in May to 78 lakhs in September. This number is expected to climb even higher: Rajesh Bhushan, Union Health Secretary pic.twitter.com/Qny1XfSf9p
— ANI (@ANI) September 9, 2021
लसीकरण वाढवावे
लसीकरणावर भर देताना केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की, आगामी सणासुदीच्या दिवसांपूर्वी आपल्याला लसीकरणाचा वेग आणखी वाढवावा लागेल. आम्ही आतापर्यंत देशात लसीचे ७२ कोटी डोस दिले आहेत. मे महिन्यात आम्ही दररोज सरासरी २० लाख डोस देत होतो, आज सप्टेंबरमध्ये आम्ही दररोज सरासरी ७८ लाख डोस देत आहोत.
अनावश्यक प्रवास टाळावा
दरम्यान, आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, सण साजरे करताना खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्वांनी गर्दी टाळावी. जेवढे छोटे कार्यक्रम तेवढी संसर्ग पसरण्याची शक्यता कमी. तसेच लोकांनी आवश्यक असतानाच प्रवास करावा. लोकांना अनावश्यक प्रवास टाळावा लागेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.