HW News Marathi
महाराष्ट्र

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु, 12 उमेदवार रिंगणात

नांदेड। राज्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान सुरु झाले आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत मतदानाची वेळ आहे. 346 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 346 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रीया सुरु झाली आहे. 12 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने एकच उमेदवार दिला आहे तर भाजपने आपल्या उमेदवाराच्या मागे मोठी ताकद लावली आहे.

काँग्रेस आणि भाजपसह तब्बल 12 उमेदवार रिंगणात

वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे. कोविड नियमावलीमुळे या मतदान प्रक्रियेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्रावर थर्मल तपासणी करून मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा जागेसाठी आज होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रमुख दावेदार काँग्रेस आणि भाजपसह तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसला आपली जागा जिंकायची आहे. तर पंढरपूरमधील पुनरावृत्ती करण्याची संधी भाजपने आखली आहे.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी 23 उमेदवारांनी 34 अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर 12 उमेदवार रिंगणात उरले आहेत. प्राप्त झालेल्या 23 उमेदवारी अर्जांपैकी दोन अवैध ठरले होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल नऊ उमेदवारांनी शर्यतीतून बाहेर पडले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या गुजराती मेळाव्याच्या भूमिकेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी एकदिवसीय उपोषण

News Desk

शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्यायला पंकजा मुंडेंना शिवसेनेत जावं लागेल -विनायक मेटे

News Desk