नवी दिल्ली।देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 6 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात 47 हजार 92 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 509 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना असल्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
एकुण आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 28 लाख 57 हजार 937 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार 825 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 39 हजार 529 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 89 हजार 583 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात भारतात 47 हजार 92 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 509 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 181 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
India reports 47,092 new #COVID19 cases, 35,181 recoveries and 509 deaths in last 24 hours, as per Health Ministry
Total cases: 3,28,57,937
Active cases: 3,89,583
Total recoveries: 3,20,28,825
Death toll: 4,39,529Total vaccination: 66,30,37,334 (81,09,244 in last 24 hours) pic.twitter.com/SJDvg3FQOH
— ANI (@ANI) September 2, 2021
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भिती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.