HW News Marathi
Covid-19

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट!

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. देशात गेल्या २ वर्षांपासून कोरोना विषाणू थैमान घालत आहे. सरकारने निर्बंध शिथिल जरी केले आहेत तरी देखील तिसऱ्या लाटेची भीती दर्शवली आहे. यातच आता गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 8 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 18 हजार 795 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 179 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या तीन लाखांच्या खाली पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख राज्यातही खाली येताना पहायला मिळत असून कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी 2895 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात काल 2 हजार 432 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 62 हजार 248 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.

देशातील सध्याची कोरोना स्थिती :

कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 36 लाख 97 हजार 581

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 29 लाख 58 हजार 002

सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : दोन लाख 92 हजार 206

एकूण मृत्यू : चार लाख 47 हजार 373

देशातील एकूण लसीकरण : 87 कोटी 07 लाख 08 हजार 636 डोस

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका

News Desk

‘भारतात सध्या ब्रिटनसारखी स्थिती’ AIIMS च्या रणदीप गुलेरीयांचं गंभीर वक्तव्य

News Desk

बीडची चिंता वाढली ! कोरोनाबाधितांचा आकडा ३६ वर

News Desk