मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारीही संख्या ठेवा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.
काय आहेत नव्या गाईडलाईन्स कोणत्या?राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवा, असे आदेश देण्यात आला आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.
नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात पन्हा एकदा १५ हजारांच्या वर रोज कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे.
- राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी संख्या ठेवा
- नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के संख्या असावी
- सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
- आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं
- धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही
Govt of Maharashtra issues fresh measures applicable till 31st March 2021, in the wake of rise in #COVID19 cases here.
All drama theatres & auditoriums to operate on 50% capacity, no entry to be allowed without proper wearing of masks. All pvt offices to function at 50% capacity pic.twitter.com/HW73jiOjgg
— ANI (@ANI) March 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.