HW News Marathi
महाराष्ट्र

नव्या गृहमंत्र्यांकडून पोलीस दलाच्या ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न ! फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना लांब ठेवणार ? 

मुंबई | राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आता पोलीस खात्याची मानहानी भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे पोलीस खात्याच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. हेच नुकसान भरून काढण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याच्या पोलिस प्रमुखपदाची अतिरिक्त जबाबदारी संजय पांडे यांच्याकडे सोपविली आहे. एक स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकारी अशी संजय पांडे यांची ओळख असल्याने हा निर्णय घेऊन नव्या गृहमंत्र्यांनी हा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे यापुढेही अशाच पद्धतीचे काही निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, लवकरच मुंबई पोलिसांसह राज्य पोलिस दलामध्ये देखील ज्येष्ठ आयपीएस अधिकारी पातळीवर मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे याच निर्णयांमार्फत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर काट मारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता अधिकाऱ्यांच्या निष्ठा तपासल्या जाणार असल्याचे स्पष्ट संकेत गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्य सरकारकडून संजय पांडेंची प्रभारी पोलिस महासंचालक म्हणून नेमणूक

महाविकासआघाडीचे सरकार येताच देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले आहे. अन्यही काही अधिकारी त्याच मार्गावर आहेत. त्यामुळे, पोलिस दलाच्या डॅमेज बिल्डिंगसाठी स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकारी दिले जाणार असून तशी यादीच तयार असल्याची माहिती मिळते. या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही परवानगी मिळाल्याची माहिती मिळत आहे. या नव्या निर्णयांसह ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना अखेर न्याय मिळाल्याचे म्हटले जात आहे. कारण राज्य सरकारकडून संजय पांडेंची प्रभारी पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नेमणूक केली. गृह विभागाने शुक्रवारी (९ एप्रिल) रात्री उशिरा याबाबतचा आदेश जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून संजय पांडेंनी व्यक्त केली होती नाराजी ?

सरकारच्या निर्णयावर नाराज असलेल्या संजय पांडेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यावेळी “राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करताना तुम्ही माझा विचार केला नाही. ही पोस्ट माझ्यापेक्षा ज्युनिअर अधिकाऱ्याला देण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी माझा विचार न करता. पुन्हा ज्युनिअर अधिकाऱ्याला या पदावर बसवण्यात आले. सुबोध जयस्वाल यांची जागा रिक्त झाल्यानंतर पुन्हा मला डावलले गेले. अतिरिक्त कार्यभार एका ज्युनिअर अधिकाऱ्याला देण्यात आला.आता पुन्हा एकदा मला डावलून मला ज्युनिअर असलेल्या अधिकाऱ्याला हा चार्ज देण्यात आला”, अशा शब्दांत संजय पांडेंनी नाराजी व्यक्त केली होती,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रत्येकी ७५ कोटींचे प्रस्ताव तातडीने द्यावेत – अजित पवार

News Desk

औरंगाबादचे शिवसेनेवरचे प्रेम आटले का ?

News Desk

केजरीवाल समोर दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांकडून धक्काबुक्की

swarit