HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाकाळात महाराष्ट्रासोबत लसच नाही तर इतर वैद्यकीय उपकरण वाटपातही दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.अशावेळी राज्यात कोरोना लसीचा मोठा तुटवडा भासत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यात कोरोना लसीअभावी अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ ओढावली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकावर एक गंभीर आरोप केला आहे. फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

“महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत”, असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक सोबत जोडलं आहे. त्यात केंद्र सरकारकडून अन्य राज्यांना आणि महाराष्ट्राला देण्यात आलेली वैद्यकीय उपकरणांची आकडेवारी चव्हाण यांनी दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं की, “महाराष्ट्राला फक्त लस देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यात सुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत.”पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे म्हटलं, पंतप्रधान हे विसरताना दिसत आहेत की, ते केवळ गुजरात, उत्तरप्रदेश आणि इतर भाजपशासित राज्यांचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बहुमत विकत घेऊ शकतो, भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला !

News Desk

कॉंग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

शिवसेना राष्ट्रपती राजवटीविरोधात सर्वोच्च न्यायालयात, कपिल सिब्बल बाजू मांडणार ?

News Desk