HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख पत्रकार परिषदेत का रडले? काय आहे नेमके प्रकरण? 

औरंगाबाद | राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. १४ नोव्हेंबरला रात्री मेहबूब शेख यांनी भेटण्यासाठी बोलावून घेतलं आणि गाडीतून निर्जनस्थळी नेत बलात्कार केल्याची तरुणीची तक्रार आहे. तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद पोलिसांनी तपास करण्यासाठी तीन पथकं तयार केली आहेत. दरम्यान मेहबूब शेख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. १४ नोव्हेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय केला मेहबूब शेख यांनी खुलासा?

औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले. संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो किंवा फोनवर बोललेलो नाही. मी १० आणि ११ तारखेला मुंबईत होतो, माझे मुंबईत कार्यक्रम होते. आरोपी मी असेन तर माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी पोलिसांकडे करतोय, असं मेहबूब शेख म्हणाले. १४ नोव्हेंबरला गावाकडं होतो. पोलिसांना सर्व पुरावे माहिती देण्यास तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असंही मेहबूब शेख म्हणाले. मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पोलिसांनी काय केला खुलासा?

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता औरंगाबाद पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर आलीय. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील 1 वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केलाय. औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथकं तयार केली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला मेहबुब इब्राहिम शेख आपण नाही, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केला आहे. फिर्याद दिलेल्या महिलेने 14 नोव्हेंबर 2020 रोजी शहरातील रामगिरी हॉटेलनजिकच्या एका महाविद्यालयाजवळील निर्मनुष्य जागेवर कारमध्ये आपल्यावर मेहबुब इब्राहिम याने कारमध्ये आपल्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यावरुन सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या मेहबुब शेख यांनी गावात या नावाचा माझ्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती नाही. मग जो गुन्हा दाखल करण्यात आलाय, तो मेहबुब शेख कोण? असा सवाल पोलिसांनाच विचारला आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन यामागील खरा सूत्रधार पोलिसांनी शोधावा, असंही शेख यांनी म्हटलंय. फिर्यादीत फक्त नावाचा उल्लेख असल्यामुळे नेमका मेहबुब इब्राहिम शेख कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

काय म्हणाल्या महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ?

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गन्हा दाखल झालाय”, असं चित्रा वाघ म्हणाल्या. या पद्धतीच्या प्रकरणांत आरोपीला अटक करण्यात येते. औरंगाबाद पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. सर्वसाधारण आरोपी असता तर त्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. चौकशी आणि तपासाच्या नावाखाली आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपी समोर दिसत असताना पोलीस का शांत बसले आहेत, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. राज्यात लागू करण्यात येणाऱ्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलीय का? हा प्रश्न चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला आहे.

मेहबुब शेख कोण आहेत?

मेहबुब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

मुळचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार इथले रहिवासी आहेत.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर परिचय आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जमावबंदीतही आंदोलन, सोयाबीन-कापसाच्या उत्पादकांसाठी स्वाभीमानीचा अन्नत्याग!

News Desk

‘ही तर फक्त सुरुवात आहे’, समीर वानखेडेंना तपासातून हटवल्यानंतर नवाब मालिकांची प्रतिक्रिया

News Desk

मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

News Desk