HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा मुंडेच्या ‘त्या’ पुस्तकामुळे वाद, धार्मिक भावना दुखावल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. करुणा यांनी फेसबूक पोस्ट करत त्यांच्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम कथेचं पुस्तक लवकरच प्रकाशित करणार असल्याचं काही दिवसांपूर्वी एक व्हिडियो पोस्ट म्हटलं होतं. या पुस्तकातून प्रकाशनानंतर काय काय समोर येणार आणि त्यातून काय वाद होणार हे प्रकाशनानंतरच कळणार आहे. मात्र, हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच यावरून वाद सुरू झाले आहेत. करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळं धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

करूणा धनंजय मुंडे या फेसबूक अकाऊंटवरून त्यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या फेसबूक पोस्टमध्ये वापरलेल्या एका पुस्तकाच्या कव्हरवरील मजकुरामुळं वाद समोर आलाय. या पोस्टमधील फोटोत असलेल्या पुस्तकाच्या कव्हरवर “होली बायबल” असं लिहिलेलं आहे, तर त्याखाली प्रेम हा शब्द मोठ्या आकारात आहे. त्यामुळं होली बायवल या शब्दांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

जगातील सर्वच ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो. बायबलला अनन्य साधारण महत्त्व असून करूणा धनंजय मुंडे यांच्या फेसबूक अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमधील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होली बायबल असे इंग्रजीत लिहून पुस्तकाचं प्रमोशन केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळं ही पोस्ट तात्काळ हटवावी. तसंच संबंधितांना असे कृत्य करण्यापासून परावृत्त करावं आणि योग्य ती कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे. दरम्यान, ज्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली होती, त्यावर रात्री उशिरा ही पोस्ट काढून टाकण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यावेळी फेसबुकवरून हे आरोप फेटाळून लावत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टी मांडल्या होत्या. हे प्रकरण आता नजरेआड होण्याच्या मार्गावर असताना, करुणा मुंडे अर्थात करुणा शर्मा यांनी केलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यात त्यांच्या पुस्तकाच्या फोटोवरून नवा वाद उभा राहिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना

News Desk

महाड इमारत दुर्घटनेत ६० जणांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू

News Desk

लॉकडाऊनविरोधात वांद्रयात मोठा जमाव, सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

News Desk