HW News Marathi
महाराष्ट्र

ख्रिसमस अन् नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागणार; आज नवी नियमावली जाहीर होणार

मुंबई । जगभरात कोरोनाच्या नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या संकटामुळे काही देशात कडक निर्बंध लावले आहेत. तसेच ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवलली जात आहे. राज्यात सध्या २३ ओमायक्रॉन रुग्ण संख्या असून एकट्या पुण्यात १५ ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. यासंदर्भात आज (२४ डिसेंबर) टास्क फोर्स सदस्यांसोबत बैठक होणार असून यानंतर आज दुपारपर्यंत १२ वाजेपर्यंत नवीन नियमावली जाहीर होणार आहे. राज्यात रात्री नाईट कर्फ्यू लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील. यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

आज होणाऱ्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंद-फडणवीस सरकारची मोठी घोषणा! प्रतिलिटर पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

Aprna

‘हा’मुख्यमंत्री वाईट आहे ,आव्हाडं अस का म्हणाले ?

News Desk

‘चंद्रकांत पाटलांना काही सुचत नाही’, सीबीआय चौकशीच्या ठरावावर अजित पवारांचा टोला

News Desk