HW News Marathi
Covid-19

राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर

मुंबई । राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील प्राथमिक शाळा बंद आहेत. मात्र, राज्याच्या शिक्षण विभागाकडून आता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचनांनुसार हे नवे वेळापत्रक जारी करण्यात आलेले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या या नव्या वेळापत्रकानुसार,१० वीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार आहे. तर १२ वीच्या लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे रोजी होणार आहेत.

परीक्षांच्या तारखा जरी जाहीर झालेल्या असल्या तरी कोरोनाचे संकट कायम असल्याने कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे अनिवार्य आहे. कोरोनासंदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ

News Desk

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रायगड दौर्‍याला सुरुवात

News Desk

रामदेव बाबा यांच्या ‘कोरोनिल’संदर्भात महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

News Desk