HW News Marathi
महाराष्ट्र

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, योगी आदित्यनाथ यांच्याबाबत साक्षीदाराने केला गौप्यस्फोट

मुंबई | २००८ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. आज (२८ डिसेंबर) न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एका साक्षीदाराने आपली साक्ष फिरवत दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्याचा छळ केला आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यास बळजबरी केली, असा धक्कादायक खुलासा केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या प्रकरणात आतापर्यंत २२० जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून आतापर्यंत १५ साक्षीदारांनी त्यांची साक्ष बदलली आहे

या खटल्यातील एका साक्षीदाराने आज महत्त्वाचे खुलासे केले आहेत. साक्षीदाराने न्यायालयात सांगितले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. जर साक्षीदाराने त्यांच्या म्हणण्यानुसार जवाब दिला नाही, तर त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचवण्यात येईल, अशा धमक्याही त्याला देण्यात आल्या होत्या. तसेच एटीएसने त्याला सात दिवस आपल्या कोठडीत ठेवले होते. योगी आदित्यनाथ यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचा आपल्या जबाबात उल्लेख करावा, यासाठी एटीएस दबाव टाकत असल्याचा दावा या साक्षीदाराने केला आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो देवधर, काकाजी, इंद्रेश कुमार यांची नावे आहेत, अशी माहिती आज साक्षीदाराने दिली.

नेमकं प्रकरण काय?

सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव येथील मशिदीजवळ झालेल्या स्फोटात सहा जण ठार झाले होते. या घटनेत सुमारे शंभर जण जखमीही झाले आहेत. मशिदीजवळ मोटारसायकलमध्ये ठेवलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास एटीएसने केला होता. मात्र, तीन वर्षांनंतर २०११ मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. आता एनआयएच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर याही यात आरोपी आहेत. शिवाय लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.

Related posts

“देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजप सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का?”

News Desk

काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने भूमिका बदलली का?, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

महाराष्ट्रात पहाटेची ॲापरेशन फसल्यानंतर सप्टेंबर महिन्यात ॲापरेशन कमळचा मुहुर्त भोंदू डाॅक्टरांनी दिलाय !

News Desk