HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कानपूर आयआयटीचा ५४ वा दीक्षांत समारंभ संपन्न, विद्यार्थ्यांना दिले ‘हे’ सल्ले

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज कानपूर आयआयटीचा ५४ वा दीक्षांत समारंभ झाला. यावेळी त्यांनी ब्लॉकचेन आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पदवी प्रदान केल्या. यावेळी संस्थेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा दिवस हा कानपूरसाठी महत्वाचा दिवस आहे. कारण, या शहराला आज (२८ डिसेंबर) मेट्रो सुविधा मिळत आहे आणि त्याचबरोबर इथे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूपाने कानपूर हे जगाला अनमोल भेट देत आहे. आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतानाचे आपण आणि इथून पदवी घेऊन बाहेर पडतानाचे आपण यात मोठे परिवर्तन जाणवेल, असेही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

कानपूर शहराचा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा विषद करताना, असे वैविध्य लाभलेल्या भारतातल्या निवडक शहरांपैकी कानपूर एक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सत्ती चारूआ घाट ते मदारी पासी, नानासाहेब ते बटुकेश्वर दत्त, आपण जेव्हा या शहराला भेट देतो तेव्हा आपण स्वातंत्र्य लढ्यातल्या बलिदानाच्या आणि त्या झळाळत्या काळातल्या नावलौकीकाला स्पर्श करत असल्याची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कानपूर आयआयटी येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनातल्या सध्याच्या टप्प्याचे महत्व मोदींनी विशद केले. यासाठी त्यांनी 1930च्या काळाचे उदाहरण दिले. त्या काळात 20-25 वर्षाचे तरुण असणाऱ्या पिढीला 1947 पर्यंतचा, स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रवास दीर्घ वाटला असेल. त्यांच्या जीवनातला तो सुवर्ण काळ होता. आज तुम्हीही अशाच प्रकारच्या सुवर्ण काळात प्रवेश करत आहात. राष्ट्राच्या अमृत काळाप्रमाणेच हा तुमच्या जीवनातला अमृत काळ आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

तंत्रज्ञानाशिवायचे आयुष्य अपूर्णच

२१ वे शतक हे संपूर्णपणे तंत्रज्ञान-प्रणित शतक असेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला. या दशकातही, समाजातील विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढतच जाणार आहे. त्यादृष्टीने तंत्रज्ञानाशिवायचे आयुष्य अपूर्णच आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आयुष्यातील तंत्रज्ञानाशी असलेली ही स्पर्धा विद्यार्थी नक्की जिंकतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशभरातील मुलांचा मूड आज काय आहे, याबद्दलचे आपले निरीक्षण नोंदवताना पंतप्रधान म्हणाले, “आज देशाचा विचार आणि मनोवृत्ती तशीच आहे, जशी तुमची आहे. आधीचे काम जर निष्काळजी आणि घिसाडघाईचे असेल, तर आज मात्र, कृतीवर आणि त्या कृतीच्या फळावर भर देऊन काम केले जात आहे. आधी जर समस्यांपासून दूर पाळण्याची वृत्ती असेल, तर आजचा संकल्प या समस्या सोडवण्याचा आहे.”

पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला

विद्यार्थ्यांनी आव्हानांपुढे आरामाला महत्व देऊ नये, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. कारण, “तुम्हाला आवडो अथवा न आवडो, आयष्यात आव्हानं असणारच आहेत. जे त्यापासून पळतील ते त्यांना बळी पडतील. मात्र, जर तुम्ही आव्हानांच्या शोधात निघाले असाल, तर तुम्ही शिकारी आहात आणि आव्हानं तुमची शिकार आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. आपला वैयक्तिक अनुभव सांगत, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिली की त्यांनी आपल्यातली संवेदनशीलता, कुतूहल, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता कायम जपावी. आयुष्यातल्या तंत्रज्ञान विरहित इतर सर्व गोष्टींबाबत देखील संवेदनशील रहा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपला आनंद आणि करुणा कोणाशी शेअर करताना मनात कुठलाही पासवर्ड ठेवू नका. अगदी मोकळ्या मनाने आयुष्याचा आनंद घ्या”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CDR मिळवणे हा गुन्हा ! सचिन सावंत यांचा फडणवीसांवर निशाणा

News Desk

भंडारा – मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना तात्काळ दिले चौकशीचे आदेश

News Desk

राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त…, पवार- शहा भेटीवर आव्हाडांचे सूचक वक्तव्य

News Desk