HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी आता थेट १ सप्टेंबरला होणार

मुंबई | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणावर अंतिम सुनावणीला आजपासून (२७ जुलै) सुरुवात होणार होती. त्याप्रमाणे, आज न्यायालयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी देखील झाली. मात्र, यापुढची सुनावणी १ सप्टेंबरला होणार असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “महाराष्ट्र सरकारने कोरोना संकटकाळात नोकर भरती न करण्याचा निर्णय घेतला घेतल्याने या प्रकरणाची अर्जन्सी नाही”, असे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे प्रकरण करण्यात अडचणी येत असल्याचेही मान्य करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयात आजपासून मराठा आरक्षण प्रकरणावर अंतिम सुनावणीला सुरुवात होती. त्याचप्रमाणे, ही सुनावणी पुढच्या ३ दिवसात पूर्ण देखील होणार होती. यावेळी युक्तिवादासाठी याचिकाकर्त्यांना दीड दिवस तर दुसऱ्या बाजूला दीड दिवस मिळणार होता. त्यामुळे, मराठा आरक्षणाचे हे प्रकरण लवकरच मार्गी लागेल असे म्हटले जात होते. मात्र, आता या प्रकरणाची पुढची सुनावणी थेट १ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Related posts

जगातील पहिल्या डिझायनर बाळाचा जन्म, चिनी शास्त्रज्ञांचा अनोख्या प्रयोगाचा दावा

News Desk

पेट्रोल डिझेल दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता | आठवले

News Desk

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही – राजेश टोपे

News Desk