HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल!

मुंबई | अँटिलिया स्फोटक आणि मनसूख हिरेन हत्ये परकरणात अडकलेले सचिन वाझे यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मासह अन्य ८ जण एनआयएच्या ताब्यात आहेत.

नेमकं काय घडलं?

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती.तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता. आधी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. मात्र, त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक कऱण्यात आली आहे.

अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांची गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या या दोन्ही प्रकरणांचा सध्या एनआयएकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्यासह काही अधिकाऱ्यांना अटक केलेली असून, त्यांची चौकशी केली जात आहे. एनआयएने न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, तिथे वाझेही उपस्थित होते, असा दावा एनआयएने केला आहे.

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यामागील हेतू काय होता? या कारणाच्या खूप जवळ पोहोचलो असल्याचं एनआयएने न्यायालयात सांगितलं. यावेळी आरोपी विनायक शिंदे याचा या गुन्ह्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचं शिंदेचे वकील गौतम जैन यांनी न्यायालयात सांगितलं. सीम कार्ड देण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे आरोपीला या प्रकरणात जबाबदार ठरवलं गेलेलं नाही, असं जैन म्हणाले. शिदे नऊ दिवसांपासून तपास यंत्रणांच्या कोठडीत असून, आणखी कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तीवादही जैन यांनी केला. दुसरीकडे नरेश गोर यांचा या प्रकरणात फक्त सीमकार्ड पुरवण्यापर्यंतच सहभाग आहे. त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं गोर यांचे वकील अफताब डायमंडवाले यांनी न्यायालयात सांगितलं. न्यायालयाने सुनावणी अंती दोघांच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत,अजित पवारांचा निलेश राणेंना सणसणीत टोला!

News Desk

गॅस सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू, 2 जण जखमी

News Desk

महाविकास आघाडी सरकारच्या पूर्ण मंत्रिमंडळ मध्ये एकाही मंत्र्यंत ओबीसी च्या मुद्यावर राजीनामा देण्याची हिम्मत नाही…..प्रीतम मुंडे

Ruchita Chowdhary