मुंबई | प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी होती त्या रात्रीची पुनरावृत्ती काल (१९ मार्च) NIA च्या पथकाकडून करण्यात आली. स्फोटक स्कॉर्पिओ प्रकरणी त्या रात्री पीपीई किट घालून चालणारा कोण? सचिन वाझे की आणखी कुणी? याची पडताळणी करण्यासाठी एनआयएचे एक पथक काल रात्री वाझेंना घेऊन अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर दाखल झाले. वाझेंना त्या रस्त्यावर पीपीई किट घालून चालवण्यात आले आणि एक प्रकारे त्या रात्रीचा संपूर्ण प्रसंगच पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न एनआयएने केला होता.
काल रात्री अंबानींच्या घरासमोर नाट्य रूपांतर सुरू झाले तेव्हा न्यायवैद्यक तज्ञांचे एक पथक एनआयएसोबत उपस्थित होते. या मार्गावरील वाहतूक बंद करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाझे यांची चाल सीसीटीव्हीमध्ये कैद असलेल्या व्यक्तीशी जुळल्यास तज्ञ तसा अहवाल देतील आणि एनआयएला आणखी एक भक्कम पुरावा मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार रस्त्यावर त्या व्यक्तीच्या चालण्याचे मार्किंग करण्यात आले आणि याच रेषेवरून वाझे यांना चालण्यास सांगण्यात आले होते. याचा एनआयएने व्हिडीओ काढला आहे. सोबतच येथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले फुटेज देखील ताब्यात घेतले आहे. त्याआधारे तज्ञ आधीचे सीसीटीव्ही फुटेज आणि आता केलेले क्राईम सिन रिक्रीएशन तपासून एनआयएला अहवाल देणार आहेत.
अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ कार २५ फेब्रुवारीला सापडली होती. एनआयएने वाझे यांना अटक करुन या प्रकरणी अधिकाधिक भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉर्पिओ आणि मुंबई पोलिसांच्या इनोव्हा कार पाठोपाठ एनआयएने आणखी तीन महागड्या गाड्या जप्त करुन पुढील तपास सुरू केला आहे.
Mumbai: NIA takes suspended police officer Sachin Waze (person donning oversized kurta in pic 2) to the place near businessman Mukesh Ambani's residence where explosives were recovered from a car last month; the agency recreates the crime scene as part of ongoing investigation. pic.twitter.com/DnLrSZJB9K
— ANI (@ANI) March 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.