HW News Marathi
Covid-19

राज्यात नाईट कर्फ्यु लागू होऊ शकतो, महाविकासआघाडी सरकारमधील नेत्याचे संकेत

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. यानुसार राज्य सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जर स्थिती सुधारली नाही, तर महाराष्ट्रात संध्याकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला जाऊ शकतो.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम पालन करा, असे आवाहन केले जात आहे. मात्र सर्वसामान्य जनतेकडून हे नियम पायदळी तुडवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार केला जात आहे.

सर्वसामान्यांनी कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळाव्यात, यासाठी अनेक ठिकाणी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन करावे, असेही सांगितले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ८८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण गेल्या २४ तासांत वाढले

News Desk

इंदापूरकर विरोधकांची पतंग कधीच आकाशात उडू देणार नाहीत !

News Desk

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा! – डॉ. नितीन राऊत

Aprna