HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला १ कोटींची नोटीस, बनावट क्लिप तयार केल्याचा आरोप

अहमदनगर | पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके सध्या कोरोना रुग्णांसाठी काम करत आहेत. अशात लंके यांची बनावट क्लिप यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला 1 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे.

अविनाश फवार असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. आमदार लंके यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी 1 कोटी रुपये आणि नोटीस खर्च 5 हजार असे एकूण 1 कोटी 5 हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी केली आहे.

आमदार निलेश लंके यांनी मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांना दिलेल्या नोटीसमध्ये 1 कोटी 5 हजार रुपये देऊन लेखी माफी मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिलाय. या 15 दिवसात त्यांनी तसं न केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा दिला आहे.

“बनावट ऑडिओ क्लिप करुन निलेश लंकेंची बदनामी”

निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, “पारनेरचे लोकप्रतिनिदी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांना कायदेशीर 1 कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे.”

मनसे पदाधिकाऱ्याकडून लंकेंवर शिवीगाळ केल्याचा केला आरोप

अब्रुनुकसानीची 1 कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांनी एक व्हिडीओ शेअर करत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलंय. तसेच आमदार निलेश लंके यांनीच फोनकरुन मला आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.

“माझा हा व्हिडीओ राज ठाकरेंना दाखवा”

आपल्यावरील आरोपांवर मनसेचे पारनेरचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, “बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही.

11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला.”

“पारनेरचे तहसिलदार नोटीस काढतात, पोलीस नोटीस देतात. त्यांच्याकडे चकरा मारत सहन करत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मानसिक त्रास देण्यात आला. त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून धमक्या देण्यात आल्या. आता मला वकिलांमार्फत नोटीस देत 15 दिवसात 1 कोटी 5 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आलीय. तसं नाही केलं तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,” असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुख अटकेच्या भीतीने गायब?, ‘ईडी’कडून शोधाशोध सुरु

News Desk

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन

News Desk

रश्मी शुक्लांना अटकेपासून दिलासा मात्र अनिल देशमुखांवर टांगती तलवार

News Desk