HW News Marathi
देश / विदेश

शिवसेनेच्या नाराजीमुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल ! निलेश राणेंचा टोला

मुंबई । “शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल. ओबामाचं आता काही खरं नाही”, असे म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बराक ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस लँड’ या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टिप्पणीबाबत संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर हा निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामा यांना झोप लागत नसेल. आता ओबामांचं कसं होणार? या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामांचं आता काही खरं नाही.”

बराक ओबामा राहुल गांधींविषयी काय म्हणाले ?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या ‘अ प्रॉमिस लँड’ या पुस्तकात म्हणतात की, “राहुल गांधी यांना काहीतरी चांगले करून दाखवायचं आहे. मात्र, त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते. ते कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी असा एक विद्यार्थी आहेत ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते.”

आम्ही म्हणतो का ट्रम्प वेडे आहेत?|संजय राऊत

“परदेशातील नेते भारतीय राजकीय नेत्यांविषयी अशी मतं व्यक्त करु शकत नाहीत. बराक ओबामा यांनी केलेल्या टिपण्णीवरुन भारतात सुरु झालेला राजकीय वादही अयोग्य आहे. आम्ही म्हणतो का ट्रम्प वेडे आहेत? आणि बराक ओबामांना भारताविषयी अशी कितीशी माहिती आहे?”, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NEET  व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक ?

News Desk

“कोकण बुडत असताना नेत्यांच्या मात्र पार्ट्या…”, ईद पार्टीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो व्हायरल

News Desk

भाजपला पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील तीन जागा मिळवण्यात यश

News Desk