HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“वाझे लादेन आहे म्हणणाऱ्या मुख्मंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, निलेश राणेंची मागणी

मुंबई | मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे सध्या अडचणीत सापडले आहेत. तसेच, राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने या मुद्यावरुन सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. यावरुनच भाजप नेते निलेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्रीच जर अशा अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? आतंकवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

 

शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते, असं सचिन वाझेंनी म्हटल्याचा मीडिया रिपोर्ट आहे. याचा अर्थ शिवसेना या क्राईममध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे याबाबतचं सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

२५ फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी सापडली. ५ मार्चला मनसुख हिरेनची बॉडी सापडली. ६ मार्चला तपास ATS कडे देण्यात आला. पण २ मार्चलाच वाझेंच्या घराजवळचे सर्व CCTV गायब झाले. हेच सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या केसमध्ये घडलं. पण तिथे आरोपी मोठ्या बापाचा मुलगा आहे म्हणून आजपर्यंत वाचला, असा दावाही त्यांनी केला आहे.

 

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपमधून बाहेर पडणे वेदनादायी !

News Desk

“आमच्यामध्ये थोडीशी नव्हे… तसूभरही चर्चा नाही”, खातेवाटप प्रश्नावर अजित पवारांचा टोला

News Desk

काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला मतदान, सुशीलकुमार शिंदेंचाही आरोप

News Desk