HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचं वयं वाढतयं तसा त्यांचा हिंदू धर्माबाबत रागही वाढतोय !

राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाले तरी मी जाणार नाही.या शरद पवारांच्या भूमिकेवरून पवारांचे वयं वाढतयं तसं हिंदू धर्माविषयीचा त्यांचा राग वाढतोय अशी टिका निलेश राणेंनी केलीये.

मुंबई| अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ॲागस्टला पार पडणार आहे,या पार्शवभूमिवर अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी CNN-News 18 यी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राम मंदिर भूमिपुजनाचे निमंत्रण मिळाले तरी आपण जाणार नाही ही भूमिका स्पष्ट केली.पवारांच्या या भूमिकेवर भाजप नेते निलेश राणेंनी सडकून टिका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की , बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं MIM पक्षाचा ओवेसी बोलतोय नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं… एवढं मात्र खरं पवार साहेबांचं वय बघून कोण काय बोलत नाही पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय.

शरद पवार काय म्हणाले होते ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, राज्यातील राजकारण चांगलेच पेटले होते. आता पुन्हा एकदा शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे. “सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा वाद मिटवला आहे. राम मंदिराबाबत आता कोणताही वाद नाही. मात्र, राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाले तरी मी जाणार नाही. याचे कारण म्हणजे, सध्या राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. राज्याच्या हिताची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे”, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. ‘सीएनएन-न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात कृषी विधेयकावरून शेतकऱ्यांचे आंदोलन!

News Desk

खासदार सुप्रिया सुळेंवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव!

News Desk

मोफत लसीकरणाच्या घोषणेवर काँग्रेसची नाराजी, राष्ट्रवादी-सेनेला थोरातांनी सुनावलं

News Desk