HW News Marathi
महाराष्ट्र

…यांच्या चौकशांना कोणी भिक घालत नाही, राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर प्रहार

मुंबई | भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. तर ७ बालकांना वाचवण्यात यश आले. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आलं. त्यानंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही, असंही निलेश राणे म्हणाले. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. दरम्यान,सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनेक फ्लॅट बळकावल्याचा आरोप, हायकोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

News Desk

MPSCExam : राजकीय स्वार्थाला बळी पडू नका – आदित्य ठाकरे

News Desk

तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी थेट रिक्षाच चालवून दाखवली

News Desk