HW News Marathi
महाराष्ट्र

“अजित पवार मीडियाने तुम्हाला डोक्यावर घेतलं तरी महाराष्ट्राची जनता तुम्हाला आपटणार”, निलेश राणेंचा प्रहार

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे राज्याच्या तिजोरीला आर्थिक चणचण भासत आहे. अशात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मिडीयासाठी ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सरकारच्या या उधळपट्टीवर आता राज्याच्या प्रमुख विरोधी पक्षाकडून अर्थात भाजपकडून टीका करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते निलेश राणे, नितेश राणे आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही टीका केली आहे.
निलेश राणे का म्हणाले?
‘डॉक्टर, नर्सेस, पोलीसांचे पूर्ण पगार द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत पण स्वत:च्या चमकोगिरीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी ५,९८,०२,४०० कोटी रुपये काढले. अजित पवार साहेब तुम्ही स्वत:वर कितीही खर्च केला व तुम्हाला मराठी मीडिया कितीही डोक्यावर घेऊ दे पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला आपटणार’,असा हल्ला निलेश राणेंनी अजित पवारांवर केला आहे.

नितेश राणे काय म्हणाले?
केवळ उपमुख्यमंत्रीच नाही तर इतर कलाकारांचे सोशल मिडीया जर पाहिले तर अचानक कलाकार सोशल मिडीयावर महाविकास आघाडी सरकाराबद्दल लिहित आहेत. हे एक PR कॅंम्पॅन आहे हे दिसून येत आहे. सगळ्यांना अचानक आदित्य ठाकरे हिरो आहे हे दाखवायचं आहे. शेवटी हा लोकांचाच पैसा आहे, असे म्हणत अजित पवारांसोबत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर?
पैसे जनतेचे जीव वाचवण्यासाठी खर्च करायचे नाहीत, फक्त प्रसिद्धीवर करायचे हे धोरण असल्यामुळे १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण थांबण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?
कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत पैशांचा ओघ कमी झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने थकविलेले जीएसटीचे पैसे द्यावेत अशी मागणी करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांसाठी कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे विकासकामांवरील निधीला कात्री लावलेली असताना अजित पवारांचेसोशल मीडिया सांभाळणाऱ्यांसाठी तब्बल 6 कोटींचा निधी राखीव ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले. यानुसार अजित पवारांकडे असलेल्या उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन उत्पादन शुल्क या खात्यांबाबतचे निर्णय, आदेश आदींची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खासगी कंपनी नियुक्त केली जाणार आहे. या कंपनीला या कामासाठी 6 कोटींचा निधी दिला जाणार आहे.
ही कंपनी अजित पवारांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम आदी सांभाळणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि संदेश पाठविण्याचे कामही या कंपनीला दिले जाणार आहे. पवारांचे सचिव, जनसंपर्क विभागाशी चर्चा झाल्यानंतर हे काम या कंपनीकडे दिले जाईल. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडी, सीबीआयकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही – संजय राऊत

News Desk

मुंबईत ‘कोरोना’चा एकही रुग्ण, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका !

swarit

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळूनही नमिता मुंदडा यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk