HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांचा महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनही राष्ट्रवादी पंढरपूर जिंकू शकली नाही !

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये २०० चा आकडा पार करू पाहणाऱ्या भाजपला ममता बॅनर्जी नावाच्या वादळाने एकहाती रोखलं होतं .एकटी वाघिण मोदी-शहांना नडली अशा आशयाच्या चर्चा संपुर्ण देशात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे एक वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयमागे शरद पवार यांचा अदृश्य हात आहे,असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांच्या एका वक्तव्याचा हवाला देत केले आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते निलेश राणे यांनी घेतला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

निलेश राणे यांनी ट्वि करत असं म्हटलं आहे की, पवार साहेबांचे अदृश्य हात असल्यालमुळे ममता बॅनर्जी बंगालमध्ये जिंकल्या असं काही जण म्हणतायत. पण पवार साहेबांचे महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असून सुद्धा पंढरपूरची १ सीट राष्ट्रवादी जिंकू शकली नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचा समाचार घेतला आहे.

 

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते ?

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले होती की ,नप.बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..!न“शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.”नयाचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता..! त्यामुळे बंगालच्या विजयामध्ये ममतादिदिंसोबत शरद पवारांचा ही वाटा आहे असा अर्थ सध्या आव्हाडांनी काढला आहे.

शरद पवार,उद्धव ठाकरे, संजय राऊतांकडून ममता दिदिंचं अभिनंदन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.पश्चिम बंगालच्या वाघिणीचं अभिनंदन. ओ दीदी, ओ दीदी, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“श्रीराम बोले मै कहाँ बडा, मै तो बीजेपी के मॅनिफेस्टो मे पडा”, सत्यजित तांबेंनी शेअर केला व्हिडिओ

News Desk

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार

Manasi Devkar

देशातील राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच!; शरद पवारांचे गौरवौद्गार

Aprna