HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

फुकटात मंत्रीपद मिळालेले आव्हाड वळवळ करतायतं !निलेश राणेंची टिका

रत्नागिरी | मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेरील स्फोटक प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. अनेक घडोमाडी घडल्या. सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. पोलिस आय़ुक्तांची बदली करण्यात आली. गृहमंत्र्यांवर माजी पोलिस आयुक्तांनी आरोप केले. या सगळ्या गोष्टींवरुन राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकासआघाडी सरकारला वेठीस धरले आहे.

यावर आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी घणाघाती आरोप केला आहे. मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटीन असलेली गाडी का उभी केली ते एनआयच्या तपासात पुढे येईल, हे प्रकरण शिजवत कोण होतं, याचे धागेदोरे कलानगरच्या बंगल्यापर्यत जातील, असं सांगत निलेश राणेंनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. फुकटात मंत्रिपद मिळालेल्या जितेंद्र आव्हाडांची उगाच वळवळ सुरु आहे, ते कोणाची एजंटगिरी करतायत? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

“जितेंद्र आव्हाडांना नैतिक अधिकार आहे का?”

दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणावरुन रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत, असा आरोप करणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. जितेंद्र आव्हाड कुणाचे एजंट आहेत? जितेंद्र आव्हाडांना नैतिक अधिकार आहे का? घरात इंजिनिअरला खेचून आणत मारणारे हे मंत्री. तुम्ही महिलेवर आरोप करताय, तुमच्या आरोपाचा आधार काय? जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या संदर्भातला एकतरी पुरावा आहे का? काही आधार काय? असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. जितेंद्र आव्हाड कशामुळे हे बोलतात, तर त्यांना फुकटात मंत्रिपद मिळालं आहे. कुठेतरी आपली वळवळ असली पाहिजे, त्यासाठी जितेंद्र आव्हाडांचे हे प्रयत्न असल्याचा बोचरा वारही निलेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांवर केला आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाडांचा आरोप?

शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांjitemdraनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Related posts

दुसरा मोदी तयार होऊ नये म्हणून मी माझे बोट आता कोणाला धरु देत नाही !

News Desk

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज खरा ठरला, वर्तवलं होतं निकालाचं भाकित

News Desk

नांदेडमध्ये 1 जूनपासून ऑनलाईन खतविक्री  

News Desk