HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”

मुंबई | आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल (३०जून) सोलापुरात असतांना दगडफेक झाली होती. तर पडळकर हे ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यात घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात गेले होते. त्यावेळी पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडली. तर या संपूर्ण घटनेनंतर आता राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी आता संतापजनक भूमिका घेत तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, असा सूचक इशारा देत तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही,अस वक्तव्य निलेश राणेंनी केलं आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा सिसिटीव्ही कॅमेरात आठवून आला आहे, तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर मोठा दगड टाकून तिथून पळ काढला गेल्या असल्याचं समजतये पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

गोपीचंद पडळकरांच्या पवारांवर टिकेनंतर दगडफेक

गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते.

मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

‘आज दगडफेक, उद्या गोळ्या मारतील’ – गोपीचंद पडळकर

महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे. ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही.

आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही. घोंगडी बैठक उरकुन बाहेर आहे. त्या बैठकीला चारशे-पाचशे लोक होते. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा ४ ते ५ लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर!

News Desk

NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा झाल्याचा राऊतांचा गौप्यस्फोट, चौकशी करण्याची मागणी

Aprna

राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू!

Aprna