HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही, निलेश राणेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर 

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीसह आघाडी सरकराच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांना सचिन तेंडुलकरची बॅटिंग आणि त्यावरील मित्राची प्रतिक्रिया याचं एक उदाहरण देत चिमटा काढला होता. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांना ट्विटरद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांच्या टीकेला निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “सचिनची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही. सचिन आऊट जरी झाला तरी देशाला त्याच्यावरती विश्वास होता की जे काही करेल ते सचिनच करेल, देशाचं सोडा पण महाराष्ट्रामध्ये पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही. साखर कारखान्यांच्या पलीकडे ज्यांना महाराष्ट्र दिसत नाही त्यांनी बोलू नये,” असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

“सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन टीव्हीवर मॅच पाहणाचा मित्र ओरडायचा… अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही!, पवारसाहेबांबाबत चंद्रकांत दादांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं,” असं ट्वीट करत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केली होती.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.

यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर सारवासारव करत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं, “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा देण्याची छगन भुजबळांनी केली मागणी

Aprna

राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk

युतीसाठी मनसे उत्सुक, भाजप मात्र,…

News Desk