HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार हरला तर त्याला शिवसेना जबाबदार असेल!

मुंबई | बेळगाव लोकसभा निवडणूक १७ एप्रिलला पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळीने यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत बेळगांवमध्ये गेले होते. त्यांच्या या बेळगाव दौऱ्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी भाष्य केले आहे.काँग्रेसला जिंकवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडण्याचे काम केले.

“महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला तर फक्त शिवसेना जबाबदार. काँग्रेसला जिंकवण्यासाठी संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल केली आणि महाराष्ट्राची बाजू कमजोर करण्याचं पाप शिवसेनेने केले. जी एकी समितीमध्ये होती, त्याच्यामध्ये फूट पाडण्याचे काम राऊतांनी केले.” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

 

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत.

त्यांच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके अशी टक्कर चांगलीच रंगणार आहे. त्यामुळे या निवडणूकीत कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर याही बेळगावात गेल्या होत्या.

Related posts

जनतेचा आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास !

News Desk

अध्यक्ष महोदय, FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, देवेंद्र फडणवीसांचा झिरवळांना सवाल

News Desk

कोरोनावर मात केलेल्या लोकांनी पुढे येऊन रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा !

News Desk