HW News Marathi
महाराष्ट्र

“संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं”निलेश राणेंची बोचरी टीका

मुंबई | बेळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी २९०३ मताधिक्य घेऊन काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यावर मात केली.दरम्यान, या निवडणूकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हेही उभे राहिले होते. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावत भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. खासदार संजय राऊत हे स्वतः त्याठिकाणी प्रचाराला गेले होते. आता निवडणुकीत शुभम शेळके यांचा पराभव झाल्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेने जे मुंबईत मराठी माणसासोबत केलं तेच बेळगावात केलं. एका तरुण मुलाला पराभवाच्या घशात ढकलला आणि मराठी माणसाची समिती कमजोर केली. आता पुढच्या निवडणुकी पर्यंत त्यांच्याकडे बघणार नाही असं ट्वीट त्यांनी केले आहे.

 

भाजपच्या मंगला अंगडी यांनी उधळला विजयी गुलाल

सुरुवातीचा 45 फेरीअखेर मंगला अंगडी यांची आठ ते दहा हजार मतांची आघाडी होती. त्यानंतर काँग्रेस सतीश जारकीहोळी यांची आघाडी होत गेली. शेवटच्या सहा फेऱ्या राहिल्या असताना जारकीहोळी हे सुमारे 400 ते 500 मताने आघाडी घेतली होती. त्यानंतर अचानकपणे या निवडणुकीला कलाटणी मिळाली. अखेर काँग्रेसवर भाजपच्या मंगल अंगडी यांनी 2903 मतांनी मात करीत विजय मिळवला.

या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अंगडी यांनी 4 लाख 35 हजार 202 मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 32 हजार 299 मते मिळाली महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 1 लाख 24 हजार 642 मते मिळाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेतुन पदाचा आदब राखला गेला नाही –  प्रकाश आंबेडकर

News Desk

“चंद्रकांत पाटील आधी झोपेतून जागे व्हा”, संजय राऊतांची विखारी टीका!

News Desk

मागण्या मान्य न झाल्यास दुकाने उघडी ठेवणार, व्यापारी संघटना आक्रमक

News Desk