HW News Marathi
महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचं मंत्र्यांसमोर काही चालत नाही’, निलेश राणेंचा टोला

मुंबई | राज्यातील कोरोना सध्या नियंत्रणात असला तरी सार्वजनिक ठिकाणी लोकांनी गर्दी करणे सुरु ठेवल्यास ही लाट उलटू शकते, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. दुसरीच लाट पुन्हा उलटेल असे उपदेशाचे डोस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मग ती मेट्रोच्या कार्यक्रमात जमवलेली हजारोंची गर्दी दुसरी लाट थोपवण्यासाठी होती का, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. आता वाटायला लागलंय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे. मंत्रिमंडळातले मंत्री कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी करतात, स्वतः मुख्यमंत्री मेट्रोला झेंडा दाखवताना तुडुंब गर्दी झाली. मुख्यमंत्री फक्त सामान्य जनतेला धडे देतात पण जिथे मंत्र्यांची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्र्याची चालत नाही, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

आरोग्य यंत्रणा आणि ऑक्सिजन बेडसचा तुटवडा असतानाही महाराष्ट्राने कोरोनाची दुसरी लाट थोपवली. आता कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला आहे. त्यामुळे पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. परंतु, कोरोनाची दुसरी लाट पूर्णणे ओसरलेली नाही. तिसरी लाट कधी येईल सांगता येत नाही. पण अशीच गर्दी होत राहिली तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल, असे उद्धव यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह देशभरात बकरी ईद साजरी

swarit

लोणार सरोवराचे पाणी लाल गुलाबी होण्याचे कारण काय?

News Desk

बिहारमध्ये निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर… संजय राऊत यांचा टोला

News Desk