HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारलाच कोरोना झालाय, भाजपची बोचरी टीका!

मुंबई।लोकल प्रवास बंद असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक प्रवासी नोकऱ्या वाचवण्यासाठी बेकायदेशीरपण प्रवास करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोकलने विनापरवानगी प्रवास करताना पकडलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय प्रेम सुरोसे असे या तरुणाचे नाव असून त्याला परळ स्टेशनवर टीसीने पकडले होते. त्यानंतर त्याने याबाबतचा व्हिडीओ शूट करुन फेसबुकवर टाकला आणि तो चांगलाच व्हायरलही झाला. या व्हिडीओनंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा दिल्याने आता ओळख पत्र तयार करून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढली. आणि या गोष्टींवर रेल्वे प्रशासन कडक नजर ठेवून आहे. असच एका तरुणाला विनातिकीट प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने पकडलं आणि त्यानंतर रेल्वेत प्रवास करताना सर्वसामान्यांचा त्रास हा या तरुणांना व्हिडिओ करून शेअर केल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

जनतेला वेठीस धरण्याचे काम हे राज्य सरकार करत असून महाराष्ट्र सरकारलाच कोरोना झाला आहे. त्यातूनच सामाजिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न सरकार करतय आणि हे दुर्दैवी वास्तव आहे. पंधरा महिन्यांपासून जनतेने जगायचं कसं याच उत्तर राज्य सरकार देत नाही मात्र पहिली लाट दुसरी लाट तिसरी लाट अशी भीती हे सरकार दाखवतय अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलीये.

सरकार कडून धोरणशून्य कर्तुत्वावर स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते मात्र सोशल मीडियावर हा तरुण जे बोलतोय ते अनेक तरुणांची भावना असून त्याचा उद्रेक होईल असं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय. राज्यातील तरुणांसह सर्वच वर्गात सामाजीक आणिबाणी विरोधात असंतोष दिसतोय. राज्यात कडक निर्बंध लादले असून ही सामाजिक आणीबाणीच आहे. कारण, आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळे रस्त्यावर उतरणाऱ्या जनतेला सामोरे जाण्याचे धाडस या सरकारमध्ये नाही असं देखील भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल

News Desk

ब्रेकिंग! मॉलमधील राड्याप्रकरणी अखेर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

Manasi Devkar

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात झाली चोरी 

News Desk