HW News Marathi
महाराष्ट्र

अहो पक्षप्रमुख, खरचं मर्द असाल तर सांगून टाका की शिवसेना  ‘सेक्युलर’ झाली – नितेश राणे

मुंबई | शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने कालपासूनच भाजपने टीकेची झोड उठवली. यात भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे.

“अहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखाला आपली शिवसेना आता ‘सेक्युलर’ झालीये. नाहीतर ‘हो मी नामर्द आहे’ असं तरी?,”,अशा शब्दात नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

कालपासून शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपने कडाडून टीका केली. अजान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा दाखल देत शिवसेनेला आता बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विसर पडलाय, असा बाण विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोडला. तर ओवेसींना पण लाजवेल अशी भूमिका शिवसेनेने घेतली,असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी कायद्याची एजंट; कायद्यानेच काम करते : किरण बेदी

News Desk

महाविकासआघाडीचे संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

News Desk

शिवसेनेने पाठींबा दाखवण्यास असमर्थता दाखवली – पंकजा मुंडे

News Desk