HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि मंत्री आदित्य ठाकरेंना लवकरचं राजीनामा द्यावा लागेल, निलेश राणेंचा दावा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण आले. महाराष्ट्र सरकारवर ताशेरे विरोधी पक्षाने ओढले. यात कायम महाविकास आघाडी सरकारवर टीका करणारे भाजप नेते निलेश राणे यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाशी आदित्य यांचा संबंध असल्याचा दावा करणारे अनेक तर्कवितर्क लावल्याचे पहायला मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब, पोलीस बदलीच्या रॅकेटचा मांडला तपशील डेटा!

News Desk

औरंगाबादेतील सिल्लोड जळीतकांडामधील पीडित महिलेचा मृत्यू

swarit

पोलीस बदलीबाबत सिताराम कुंटे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

News Desk