मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. आणि तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. या दोन्ही नेत्यांकडून ड्रग्ज आणि अंडरवर्ल्डशी संबंधीत कनेक्शन असल्याचा दावा करण्यात येत आहेत. दरम्यान, निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीस यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. तसेच खोटे आरोप जीवन उध्वस्त करतात. अशा प्रकारचं ट्विट त्यांनी सोशल मीडियावर केलं आहे.
नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये ?
निलोफर मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, खोटे आरोप जीवन उद्धस्त करतात आणि एखाद्याने आरोप आणि निंदा करण्यापूर्वी ते कशाबद्दल बोलत आहेत. हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नोटीसमधून खोटे दावे आणि विधान हे माझ्या कुटुंबावर केले आहेत. त्यामुळे आता मी मागे हटणार नाहीये. अशा प्रकारचं ट्विट करत निलोफर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
False accusations ruin lives. Before one accuses or condemns they must know what they are talking about. This defamation notice is for the false claims & statements which Mr. @Dev_Fadnavis has put on my family. We will not back down. pic.twitter.com/xsQYcgDhMb
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 11, 2021
नवाब मलिक VS देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत आमच्या जावयावर काही गंभीर आरोप केले होते. समीर खान यांच्या घरातून ड्रग्ज सापडल्याचे आरोप करण्यात आले होते. आम्ही कालच सांगितलं होतं की, माझी मुलगी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. त्यानुसार तिने देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. परंतु फडणवीस यांना क्षमा मागण्याची मागणी करण्यात आली आहे. जर त्यांनी क्षमा मागितली नाही, तर फडणवीसांवार अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. या देशात बोलण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. परंतु बदनामी करण्याचा नाही. निश्चितरूपाने ज्यांची बदनामी होत आहे. त्यांना पुढे जाण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे माझी मुलगी निलोफरने देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. असे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
पुढे नवाब मलिक म्हणाले की, द्वारकामध्ये सुद्धा ३५० कोटीचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. हा योगायोग असू शकतो का?, मनिष भानुषाली, धवल भानुषाली, केपी गोसावी आणि सुनिल पाटील हे सर्व लोक सतत अहमदाबादच्या पंचतारांकित ५ स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. हे सर्व लोक ड्रग्जचे खेळाडू आहेत. हा ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू होत नाहीये ना? अशा प्रकारचा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.