HW News Marathi
देश / विदेश

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Union Budget Live नवी दिल्ली | देशाचे अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी) सादर होणार आहे. केंद्रातील मोदी सरकार आज आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घएतली. संसदेत काल (३१जानेवारी) आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर ६ ते ६.५ टक्क्यांची पातळी गाठेल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ९ वाजता अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांसोबत फोटोसेशन होईल. यानंतर अर्थसंकल्प २०२०-२१ सादर करण्यासंदर्भात औपचारिक परवानगी घेण्यासाठी त्या राष्ट्रपती भवनात जातील. राष्ट्रपती भवनातून अर्थमंत्री मंत्रिमंडळ बैठकीसाठी संसदेत जातील, तिथे अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. यानंतर निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता लोकसभा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे.

२०१६ पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस बजेट सादर करण्याची प्रथा होती. मात्र तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ पासून एक फेब्रुवारीला बजेट सुरु करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे रेल्वे आणि सर्वसाधारण बजेट स्वतंत्रपणे मांडले जात असे. परंतु आता दोन्ही बजेट एकत्रच सादर केली जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

विनायक मेटे फडणवीसांच्या इशाऱ्यावर जनतेची दिशाभूल करतायत !  

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

Aprna