HW News Marathi
महाराष्ट्र

नितेशच्या वागण्याला माझे समर्थन नाही !

मुंबई । आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी(४ जुलै) उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चक्क चिखलाने आंघोळ घातली. मुंबई गोवा महामार्गावर अनेख खड्डे पडले आहे. या खड्डयांचा त्रास या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होतो. येता-जाता वाहनांवर आणि वाहनधारकांच्या अंगावर चिखल उडाल्यामुळे मनस्ताप होतो. याच मनस्तापाची प्रचिती उपअभियंत्यांनाही यावी म्हणून नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गाठले आणि त्यांना या रस्त्याच्या दुरावस्थेसाठी जाब विचारला. त्याचवेळेस त्यांच्या अंगावर बकेटभर चिखलही ओतला.

मात्र या घटनेनंतर नितेश राणेंचे वडील आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी नितेश या कृत्याचा निषेध केला आहे. हे कृत्य अतिशय चुकीच आहे मी त्याला पाठींबा देणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. महामार्गावर आंदोलन करणे योग्य आहे पण अशा प्रकारची वागणूक समर्थनीय नाही. नितेशच्या समर्थकांनी अशा प्रकारे हिंसा करणे अत्यंत चुकीच आहे. याला मी समर्थन देणार नाही असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आधी गडनदीच्या पुलावर बांधून ठेवले आणि नंतर त्यांच्या एका कार्यकर्त्यांने शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाने भरलेली बादली ओतली. त्याचवेळी नितेश यांनी अतिशय संतापात शेडेकरांना जाब विचारला. सामान्य माणसाला होणरा त्रास तुम्हीपण अनुभवून बघा असे म्हणत त्यांच्यावर रोष व्यक्त केला.

दरम्यान याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राणे पोलिसांसमोर शरण आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह तिघांना अटक केली तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेच्या कारवाईनंतर त्यांना कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंचा नवा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी दिला सूचक इशारा

News Desk

Tauktae Cyclone : ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौरा करणार 

News Desk

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ कोटींहून अधिक ज्येष्ठांनी घेतला ‘एसटी’च्या मोफत प्रवासाचा लाभ

Aprna