HW News Marathi
अर्थसंकल्प

#Budget2019 : यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदारांना मिळणार खुशखबर ?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या २.० चा सरकाचा पहिला अर्थसंकल्प उद्या (५ जुलै) लोकसभेत मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणते बदल केले जातील का हे पाहणे गरजेचे आहे.

अंतरिम बेजटमध्ये पियूष गोयल यांनी संसदेत मांडले होते. मोदी सरकारने तेव्हा पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये बसलेला फटका, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी-नोकरदार वर्गात असलेली नाराजी आणि तोंडावर आलेली लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन मोदी सरकारने अंतरिम बजेटमध्ये तसा निर्णय घेतला होता. करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट ५ लाख रुपये करण्यात आले होते. त्याचा फायदा देशभरातील ३ कोटी करदात्यांना झाला आहे तर ८० सी अन्वये वजावटीची मर्यादा १.५ लाख रुपयेच कायम ठेवण्यात आली होती.

परंतु मोदी सरकाच्या दुसऱ्या पर्वात मात्र सरकारकडून आयकरसाठी लागणारी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची शक्यता आहे. पूर्व अर्थसंकल्प सल्लागारांनी याबाबत सांगितले की, वैयक्तिक करदात्याच्या इनकम टॅक्समध्ये सध्या अडीच लाखापर्यंत मिळणारी सूट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच १० कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचा टॅक्स ४० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Budget2019 : हा मोदी सरकारचा अर्थसंकल्प कि मतसंकल्प ? जाणून घ्या

News Desk

Budget 2019 : २० रुपयांचे नवे नाणे, तर १ ते १० रुपयांचे नाणे नव्या रुपात येणार

News Desk

‘या नेत्याने’ तब्बल १० वेळा सादर केला अर्थसंकल्प , विक्रम आजही अबाधित …..

Arati More